Breaking News

मराठा समाजाच्या आरक्षणासोबतच मराठा समाज बांधवांच्या विविध मागण्यां संदर्भात मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयीन दालनात नामदार एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सकारात्मक

42 बांधवांच्या परिवारांना तात्काळ दहा लाख रुपये देणार त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येकी एक व्यक्तीला नोकरी सरकार देणार — नामदार एकनाथ शिंदे

 

5 तारखेच्या आत 42 बांधवांच्या कूटूबाला दहा लाख रुपये आणि कुटुंबातील व्यक्तीला नोकरी आणि विविध मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्या अन्यथा 9 ऑगस्ट क्रांती दिन राज्यभर आंदोलन करणार

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा राज्य सरकारला इशारा

मराठा आरक्षण व त्यासंदर्भातील राज्य शासनाची भुमिका या विषयांवर विस्तृत चर्चा करतानाच मराठा आंदोलनात आत्मबलिदान देऊन शहीद झालेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत देणे तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देणे त्याचप्रमाणे या आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झालेल्या १३७०० मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उध्दवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल नामदार एकनाथ शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना ग्वाही दिली.

यासमयी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे,मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील, गणेश कदम,करण गायकर,रवींद्र काळे पाटील,आप्पासाहेब कुढेकर आदी मान्यवर रोहित 42 शहीद बांधवांचा परिवार उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात……

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात…… मुंबई : …

लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, 16 जण होरपळले

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात एका इमारतीत गॅस सिलेंडरचा …

महिलेचं आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत वास्तव्य, धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *