Breaking News

मालेगाव महापालिका प्रशासनाचे बकरी ईद साठी उत्तम व्यवस्थापन.

शिवशक्ती टाइम्स न्यूज (आनंद दाभाडे )

कोरोणा च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात आलेले नव्हते, परंतु घरोघरी होणारे मोठ्या प्रमाणातील कुर्बानी लक्षात घेऊन मालेगाव महानगरपालिकेकडून बकरी ईद साठी आयुक्त त्रंबक कासार यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त मुख्यालय रोहिदास दोरकुळकर , उपायुक्त विकास नितीन कापडणीस आणि महापालिका अधिकाऱ्यां कडून सूक्ष्म नियोजन व व्यवस्थापन करण्यात आले होते.

मालेगाव बकरी ईद साठी महापालिका प्रशासनाने संपूर्ण 21 वार्डमध्ये विविध ठिकाणी 60 पेक्षा अधिक स्पॉट फिक्स केले होते. वाडाचे स्वच्छता निरीक्षक यांचे नावासह भ्रमणध्वनी क्रमांक व ठिकाण नागरिकांच्या सोयीसाठी प्रसारित करण्यात आले होते. कंपोस्ट डेपोवर कचरा वेस्टेज जमिनीत पुरण्यासाठी मोठे मोठे सहा खड्डे खोदण्यात आले होते, तर सुमारे 100x10x10 आकाराची मोठी चारी खोदण्यात आली होती. कचरा खड्ड्यांमध्ये टाकण्यासाठी पोकलेन व जेसीबी ची व्यवस्था करण्यात आली होती.शहरात कचरा व वेस्टेज उचलण्यासाठी व वाहून नेण्यासाठी महापालिकेचे 6 व भाड्याने 3 असे एकूण 9 जेसीबी मशीन, महापालिकेच्या 22 घंटागाड्या, मनपाचे 3 टिप्पर व भाड्याने घेतलेले 1 असे एकूण 4 टिप्पर, वॉटर ग्रेस कंपनीच्या 91 घंटागाड्या आणि ट्रॅक्टर, याव्यतिरिक्त अतिरिक्त 30 ट्रॅक्टर ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच साफसफाई व रस्ता इत्यादी जागा धुण्यासाठी मनपाची तीन टॅंकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्याचप्रमाणे संपूर्ण शहरात सोडियम हायपो क्लोराइड व मॅलेथिऑन जंतुनाशक, कीटकनाशक यांची फवारणी मनपाच्या ट्रॅक्टर व कंटेनर द्वारे करण्यात आली त्याचबरोबर कार्बोलिक पावडर चा छिडकावही जागोजागी करण्यात आला.
महापालिकेकडून शहरात साफसफाई स्वच्छता फवारणी यांची उत्तम तजवीज करण्यात आली, देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. दिवसभरातील संपूर्ण कचरा वेळीच महापालिकेकडून उचलण्यात आला.

महापालिकेच्या कामाबद्दल सर्वस्तरातून नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर स्वच्छ, निरोगी व आरोग्यदायी मालेगाव साठी महापालिकेचे सदैव प्रयत्न राहतील असे आयुक्त यांनी यावेळी सांगितले. बकरी ईदच्या नियोजन व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष कृती इत्यादी कामासाठी आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

जनसंपर्क अधिकारी
मालेगाव महानगरपालिका मालेगाव

About Shivshakti Times

Check Also

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात मालेगांव शहरातील हॉटेल मराठा दरबार येथे घेतलेल्या बैठकीचे …

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *