Breaking News

मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशन तर्फे कृषिमंत्री मा.ना.दादासाहेब भुसे यांना मर्यादित विद्यार्थी संख्येचा नियम बनवून क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव – दि.2 ऑगस्ट रोजी मालेगावातील सर्व खाजगी क्लासेसच्या संचालकांच्या मालेगाव कोचिंग क्लासेस असोसीएशनतर्फे ना.दादा भुसे साहेबांना निवेदन देऊन क्लासेस सुरू करण्याची परवानगी मागितली, कमी विद्यार्थी संख्या घेऊन व social distancing चे सर्व नियमांचे पालन करून कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देणेत यावी याकरता हे निवेदन देण्यात आले.

विषय :- कोरोणा विषाणूच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद असलेले खाजगी क्लासेस अटी व शर्तींचे पालन करून सुरू करण्यास परवानगी मिळणेबाबत..

या निवेदनाद्वारे मालेगाव तालुक्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासचे प्रतिनिधी यांनी सरकारच्या दरबारी निरोप पोहोचवला की कोरोणा विषाणू (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शासनाच्या नियमांचे पालन करत सर्व कोचिंग क्लासेस बंद आहेत. तो काळ वार्षिक परिक्षांचा होता व मोठ्या प्रमाणात फी विद्यार्थ्यांकडे शिल्लक राहिली होती परंतु क्लासेस बंद झाल्याने वसुली झाली नाही व सर्व खाजगी क्लासेसच्या वर्षभराच्या मेहनतीवर संपूर्णतः पाणी फिरले व सर्वांवर बेरोजगारीबरोबरच आर्थिक संकट कोसळले आहे. कुटुंब चालवतांना प्रचंड त्रास होत असून हातऊसनवार पैसे मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतांना अडचणी येत असून खाजगी क्लासेसचा बोजवारा उडाला आहे. शासनाच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आम्ही ऑनलाईन क्लासेस घेतले परंतु त्यात पालक फी देत नाहीत त्यामुळे आम्हाला सध्या उत्पन्नाचा कुठलाच स्रोत शिल्लक नाही.

त्यामुळे आपणांस असोसिएशनच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली की पालकांचे विद्यार्थ्यांना क्लासेसला पाठवण्याबाबतचे संमतीपत्र घेण्याबरोबरच क्लासेसचे जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याच्या अटींवर अर्ध्या-अर्ध्या विद्यार्थी संख्येसह, मास्कचा वापर बंधनकारक करून दोन-दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर ठेऊन क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अथवा आपल्या स्तरावरून शासनाकडून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी लाॅकडाऊन असेपर्यंत काहीतरी आर्थिक मदत करण्यात यावी.
व शासनाकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा केली.
निवेदन देण्यासाठी प्रतिनिधी म्हणून खालील शिक्षक उपस्थित होते.
1)संजय हिरे सर 2)प्रमोद देवरे सर 3)अंकुश मयाचार्य सर 4)योगेश पवार सर 5)अमोल अहिरे सर 5)डी. एल. अहिरे सर 6)रामदास नवगिरे सर 7)ममता मेहता मॅडम 8)दिनेश श्रीखंडे सर 9)राकेश पवार सर
10)पवन पगारे सर 11)सुमित पाटील सर 12)सुजाता नवगिरे मॅडम 13)निवृत्ती कोते सर  14)नरेंद यादव सर 15)गौरव मंडाळे सर
तसेच इतरही शिक्षक उपस्थित होते.मालेगावातील सर्व खाजगी क्लासेसच्या शिक्षकांचा ह्या निवेदनाला पाठिंबा होता.

About Shivshakti Times

Check Also

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

Leave a Reply

Your email address will not be published.