शिवशक्ती टाइम्स न्यूज
नवी दिल्ली ⭕- विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहेत. शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील जंक फूड आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
एफएसएसएएआयने शाळेच्या परिसरातील 50 मीटरपर्यंत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व जाहिरातींवर बंदी घातली आहे.
शालेय मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीने हे मोठं पाऊल उचललं गेल्याची माहिती मिळत आहे. एफएसएसएआय अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार नवीन तत्त्वे लागू करीत आहे. शालेय मुलांसाठी सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार आहार देणे हा त्याचा हेतू आहे.⭕