Breaking News

 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा – शिवशक्ती टाइम्स न्यूज

🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑
✍️ पुणे 🙁  ब्युरो चीफ शिवशक्ती टाइम्स न्यूज )

पुणे :⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून पुणे जिल्ह्याअंतर्गत ४० मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेला नुकतीच सुरुवात झाली आहे.

नेहमीच्याच दरात ही एसटीची सेवा सुरु करण्यात आली आहे. या प्रवासासाठी कुठल्याही ई-पासची आवश्यकता नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे…

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु केली असून, सध्या ५५ बसेस रस्त्यांवर धावत आहेत.

सरकारने फिजिकल डिस्टंसिंगच्या घालून दिलेल्या नियमांप्रमाणे, प्रत्येक बसमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा निम्म्याच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. १० ते १२ एसटी गाड्या या वाकडेवाडी आणि स्वारगेट बस डेपोमधून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोडण्यात येत आहेत.

तर इतर बससेवा या तालुक्यांच्या मुख्यालयांना जोडणाऱ्या असणार आहेत. अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली आहे.

या मार्गावरील बससेवा सुरू
या एसटी गाड्या पुण्याहून बारामती, भोर, शिरुर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, दौंड, पाटस, नीरा, जुन्नर, आळेफाटा, भीमाशंकर, वेल्हा, पौड, मुळशी या मार्गावर सुरू आहेत.

तसेच बारामती-भिगवण, बारामती-वालचंदनगर, बारामती-दौंड, स्वारगेट-वेल्हा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, नारायणगाव-जुन्नर आणि जुन्न-देवळे या मार्गावर सुरु करण्यात आल्या आहेत…

About Shivshakti Times

Check Also

रात्र पाळीत ड्यूटीवर कर्तव्यावर असणार्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा, ताे पाेलीस शिपाई बडतर्फ…..

पुणे – शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात रात्रपाळीच्या ड्यूटीवर असणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करून बंदुकीतून स्वतःवर …

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, मारहाणीत पत्नीचे दातच पाडले……..

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, ⭕मारहाणीत पत्नीचे दातच पाडले…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज – …

सांगली खून प्रकरण गुन्हे शाखा युनिट चार पिंपरी-चिंचवड कडून मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक व गुन्हा उघड

पिंपरी-चिंचवड-  प्रतिनिधी – युसूफ पठाण  याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published.