शासकीय जमीनी व गायरान जमीनी अनुसूचित जातीच्या भुमिहीन व बेरोजगारांना हस्तांतरणीत करण्यात याव्यात-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे..
नाशिक रोड (प्रतिनिधी-आनंद दाभाडे ) दिनांक १०/८/२०२० सोमवार रोजी आरपीआय(आठवले)पक्षाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त श्री. राजाराम माने साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले….
१)एरंडोल तालुक्यातील सिंल्लीग जमीन विना परवानगी गट नंबर ५१५/१ खरेदी विक्री व्यवहार करण्यात आला आहे,चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी….
२)नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा येथील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी सीआयडी मार्फत चौकशी करून खरा सुत्रधारास अटक करावी….
३)लाँकडाऊन मुळे सर्व सामान्य गोरगरीबांना कामधंदा नसुन त्यांचे मागील तीन महिन्याचे लाईट बील माफ करावे किंवा शक्य नसल्यास पन्नास टक्के वीज बिल माफ करावे….
४)कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत भुमिहीनाना तातडीने जमीनीचे वितरण करा व अन्य मागण्या करीता आरपीआय(आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, आरपीआय(आठवले)पक्षाचे नाशिक महिला जिल्हाध्यक्ष सौ.गुफांताई भदरगे, जळगाव एरंडोल तालुका अध्यक्ष प्रविणभाऊ बाविस्कर, एरंडोल तालुका सरचिटणीस सिताराम मराठे,युवा नेते प्रशांतजी गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…