Breaking News

*एका व्यापाऱ्याचं पत्नीवरील प्रेम* *प्यार के लिये साला कुछ भी करेगा*

*एका व्यापाऱ्याचं पत्नीवरील प्रेम*
*प्यार के लिये साला कुछ भी करेगा*
( ब्युरो चिफ -शिवशक्ती टाइम्स न्यूज )

कर्नाटकमध्ये एका व्यापाऱ्याने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दु:खी न होता तिच्या प्रेमाखातर जिवंत वाटणारा हुबेहुब सिलिकॉनचा पुतळा तयार करुन घेतला. तसेच त्या पुतळ्यासोबत नवीन घरात गृहप्रवेशही केला.
कर्नाटकमधील कोप्पलमध्ये राहणारे व्यापारी श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नी माधवी यांचा 2017साली तिरुपती बालाजीला जात असताना एका कार अपघातात मृत्यू झाला होता. त्या दोघांनी एकत्र आपल्या नव्या घराचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या जिवंतपणी हे स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, परंतू श्रीनिवास यांनी पत्नी गेल्यावरही ते स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचा सिलिकॉनचा पुतळा बनवून घेतला.
श्रीनिवास यांनी बंगळूरच्या श्रीधर मूर्ती या आर्टिस्टकडून हा पुतळा तयार करुन घेतला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी आर्टिस्टला एक वर्षाचा कालावधी लागला, असं त्यांनी सांगितलं.
गृहप्रवेश करताना माझ्यासोबत या घरात माझी पत्नी देखील आली आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. घराचं स्वप्न हे तिचं होतं, अशी भावना श्रीनिवास गुप्ता यांनी व्यक्त केली.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *