जागतिक फोटोग्राॅफी दिवस विशेष
सचिन वाकडे, मुल
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईलरुपी कॅमेरा असून त्यातून मानव जिथे जाईल तीथे स्मरणात व संग्रही ठेवण्याकरीता मोबाईलने फोटो काढत असल्याचे चित्र सगळीकडे पाहावयास मिळते. पुर्वीचा काळी छबी टिपण्यासाठी चित्रकारितेचा उपयोग केला जाई.
1839 मध्ये सर्वप्रथम फ्रांसचे वैज्ञानिक लुईस जेकस तथा मेंडे डाग्युरे यांनी फोटो तंत्रज्ञान संशोधनाचा दावा केला होता. ब्रिटिश वैज्ञानिक विलियम हेनरी फाॅक्सटेल बोट यांनी निगेटिव-पाॅजीटिव तर 1834 मध्ये टेल बाॅट यांनी लाईट सेंसेटिव पेपरचा आविष्कार केला. ज्यातून काढलेले चित्राला कायमस्वरुपी ठेवण्याची सुविधा मिळाली.
फ्रांसचे वैज्ञानिक आर्गो यांनी 7 जनवरी 1839 ला फ्रेंच अकादमी आॅफ सायंससाठी एक रिपोर्ट तयार केली. फ्रांस सरकारने ती विकसित रिपोर्ट खरेदी करुन सामान्य जनतेसाठी, सर्वांसाठी 19 आॅगस्ट 1939 ला घोषित केली. त्यामुळे 19 आॅगस्टला विश्व फोटोग्राॅफी दिवस साजरा केल्या जाते. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला जन्मासोबतच कॅमेरा दिलेला असून, त्याद्वारे तो पृथ्वीवरील प्रत्येक वस्तुची छबी आपल्या मेंदूत अंकित करतो. तो कॅमेरा त्याच्या डोळा असून त्या दृष्टीने पाहिले, तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राॅफर आहे.
वैज्ञानिक प्रगती बरोबरच मानवाने आपले साधन वाढवण्यास सुरुवात केली व अनेक आविष्कारासोबत कृत्रिम लेंसची निर्मिती झाली. वेळेनुसार पुढे या लेंसपासून प्राप्त छबीला स्थायी रुप देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला यशस्वी करणाऱ्या दिवसाला आज विश्व फोटोग्राॅफी दिवस म्हणून साजरे केले जाते.
वैज्ञानिक तथा यशस्वी तंत्रज्ञानामुळे फोटोग्राॅफीने आज भरपूर प्रगती केली. आज व्यक्तीजवळ अत्याधुनिक असे साधन उपलब्ध आहेत, बटन दाबण्याची वेळ आहे आणी काहि मिनीटांत चांगल्यात चांगली फोटो त्यांच्या हातात असते. चांगले साधनच जर चांगले फोटो प्राप्त करुन देण्याची हमी देवू शकला, तर मानव मेंदूचा उपयोग का केला असता.
तंत्रज्ञानाने कितीहि प्रगती केली तरी कुठे ना कुठे मेंदूच काम करीत असतो हिच तफावत मानवाला अन्य प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बनविते. फोटोग्राॅफी क्षेत्रात मेंदू व समयसुचकता चांगली छबी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ठरते. आपल्या डोळयांना दिसनाऱ्या दृश्याला कॅमेराचा मदतीने एका फ्रेममध्ये बांधने, प्रकाश व छाया, कॅमेराची स्थिती, एक्सपोजर तथा विषयाची निवड हे चांगले फोटो प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे. हेच कारण आहे कि, प्रत्येक घरात मोबाईलरुपी एक कॅमेरा असूनही चांगले फोटोग्राॅफर मोजण्याइतके असतात.
सर्व मोबाईलरुपी फोटोग्राफर व व्यावसायीक फोटोग्राॅफर यांना जागतिक फोटोग्राॅफी दिनाच्या शुभेच्छा…!