Breaking News

उच्चशिक्षित युवकाने उभारला सांभार वड्याचा व्यवसाय….शिवशक्ती टाईम्स न्यूज

आशिष देविदास सालोरकर , मुल जिल्हा चंद्रपूर, २७ वर्ष शिक्षण पदवी, ITI फिटर, १० वी पर्यंतचे शिक्षण नवभारत विद्यालय मूल येथे झाले. १२ व एनसीसी पर्यंत चे शिक्षण कर्मवीर महाविद्यालयात झाले.२०१० ते २०१२ फिटर ट्रेड मध्ये ITI करून डिप्लोमा मिळविला…
वडील विदर्भ कोंकण ग्रामीण बँक मध्ये लिपिक पदावर गडचिरोली येथे कार्यरत होते.२०१२ ला वडिलांचे आकस्मिक निधन झाले व सर्व जबाबदारी आशिष वर मोठा असल्याने आली. बँकेत अनुकंपावर लागणार नाही. त्यामुळे नोकरीचा प्रश्न उरला नाही अस सांगण्यात आलं व कुटुंबाची जबाबदारी वयाच्या २१ व्या वर्षीच खांद्यावर आली त्यामुळे २०१३ ते २०१८ पर्यंत MIDC मूल येते काम करत स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा सुरू होती. पोलीस भरती, आर्मी भरती व शासकीय अनेक भरत्या दिल्या पण या बेरोजगारीत नोकरी मिळणे तेवढं शक्य नाही , जिल्ह्यात रोजगार नाही, जिल्ह्यात असंख्य युवा बेरोजगार आहेत कंपन्या असून हाताला काम नाही .निवडणुकीपुरती खासदार व आमदार आश्वासन देतात पण आश्वासनाची पूर्तता कधी होताना दिसलीच नाही ,जिल्ह्यात रोजगाराचा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे, जगण्यासाठी पोट भरण्यासाठी ,घर चालवण्यासाठी ,पैसा हवा असतो. मेहनत केल्याशिवाय पैसा येणार नाही. कुठल्यातरी क्षेत्रात उतरून काम करणं गरजेच आहे ,नोकरीसाठी भटकती केली पण हाताला नोकरी लागलीच नाही, मेहनतीचे फड मिळाला नाही.म्हणून आशिष नी स्वतःचा छोटा व्यवसाय असावा म्हणुन १७.८.२०२० ला हातगाडी सुरू केली.सोबतीला लहान भाऊ निखिल सालोरकर वय २२ वर्ष हा सुद्धा सकाळी मदत करतो.निखिल च शिक्षण पुण्याच्या नामांकित डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल शाखेत BE याच वर्षी पूर्ण झालं आहे. एवढं शिक्षण असून सुद्धा कसलीही लाज न ठेवता आज निखिल आपल्या मोठया भावाच्या पाठीशी उभा आहे. मुल तालुक्यातील असंख्य युवा बेरोजगार आहेत, त्यांनी आप आपले क्षेत्र निवडण्याची खरी गरज आता आहे, कामाचं क्षेत्र कुठलं पण असो त्याची आवड तयार करणे खूप गरजेचे आहे,

तालुक्यातील युवकांनी अशिष् सालोरकर आदर्श घेऊन समोर आपली वाटचाल सुरू करावी…
पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर योजनेचं हे जिवंत उदाहरण म्हटलं तरी चालेल.

About Shivshakti Times

Check Also

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published.