*होय! आता आपल्या मालेगांवात साकार होणार कृषी विज्ञान संकुल…*
*कृषीमंत्री मा.ना.दादाजी भुसे* यांच्या पाठपुराव्याने मालेगांव येथे कृषी विज्ञान संकुल निर्मितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली असून या अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय,अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना.
२०२०-२१ ह्या शैक्षणिक वर्षापासुन कृषी व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास तसेच ह्या साठी शिक्षक व शिक्षकेत्तरच्या ७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच हे संकुल जवळपास ४१९ एकरामध्ये उभारण्यात येणार आहे.