Breaking News

मालेगाव महानगरपालिकेकडून श्री गणपती विसर्जन 2020 साठी शहरातील विविध 13 ठिकाणी कृत्रिम कुंडांची निर्मिती

शिवशक्ती टाईम्स न्यूज –

जनसंपर्क विभाग मनपा मालेगाव.
दि.29 ऑगस्ट -मालेगाव महानगरपालिकेकडून श्री गणपती विसर्जन 2020 साठी शहरातील विविध 13 ठिकाणी कृत्रिम कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोणा साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे उद्देशाने उक्त विसर्जन कुंडांची निर्मित करण्यात आली असून मालेगाव शहरातील श्री गणेश मंडळ, गणेश भक्त, नागरिकांनी आपल्या जवळच्या परिसरातील कृत्रिम कुंडांवर विसर्जन करावे, साथीची पार्श्वभूमी असल्याने शक्य झाल्यास नागरिकांनी घरगुती विसर्जनावर भर द्यावा असे महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे.

*:कृत्रिम विसर्जन स्थळ व कुंडांची यादी:*

*1) महादेव घाट ::-* संगमेश्वर सार्वजनिक श्री गणेश मंडळ, मालेगाव गावठाणातील पुर्व भाग व लगतचा परिसर

*2) वाल्मिक नगर शाळा::-* संगमेश्वर गावठाणातील घरगुती श्री गणेशमुती

*3) टेहेरे चौफुली गिरणा नदी::-* सोयगाव गावठाण घरगुती व सार्वजनिक श्री गणेश मुती, आयोध्या नगर, स्वप्नपुती नगर व लगतचा परिसर

*4) सोयगाव फायर स्टेशन::-* सोयगाव नववसाहत व लगतचा परिसर

*5) अंबिका कॉलनी अंबिका मंदीर स.नं.५६/२ मालेगाव कॅम्प::-* चर्च ते डि. के. कॉर्नर पश्चिमेकडील भाग,लगतचा परिसर

*6) गोळीबार मैदान स.नं. ६६/२ जवळील ओपनस्पेस::-* कृषी नगर, जयहिद कॉलनी, एकनाथ बाबापुतळा परिसर, दौलती शाळेजवळील व लगतचा परिसर

*7) संभाजी नगर, स.नं. ७४/२ नामपुर रोड शिवनेरी बंगल्या समोर::-* चर्च गेट ते भोसले पेट्रोल पंप नामपुर रोडाची पूर्व पश्चिम बाजु लगतचा परिसर

*8) भायगाव पुष्पाताई हिरे नगर स.नं. २०२ गणपती मंदीर मराठी शाळा परिसर::-* भायगाव नववसाहत व लगतचा परिसर

*9) भायगाव गावठाण नदी किनारी पुला जवळ::-* भायगाव गावठाण व लगतचा परिसर

*10) कलेक्टर पट्टा स.नं. २६५ महारुद्र हनुमान परिसर::-* कलेक्टर पट्टा व लगतचा परिसर

*11) द्याने फरशी पुला जवळ ग.नं. २४२::-* द्याने गावठाण व लगतचा परिसर

*12) शिवाजी जिमखाना::-* श्रीराम नगर, टिळक नगर, वर्धमान नगर,शिवाजी नगर, बारा बंगला व लगतचा परिसर.

*13) कॅम्प गणेश कुंड ::-* हिम्मत नगर, साने गुरुजी नगर, सिंधी कॉलनी,पंचशिल नगर, कॅम्प गावठाण, मांची कॉर्नर पर्यत व लगतचा परिसर

*दरेगाव व सायने येथील नागरिकांनी सालाबादप्रमाणे पारंपारिक ठिकाणी श्री चे विसर्जन करावे.*
श्री गणेश विसर्जनासाठी मालेगाव महापालिका प्रशासनामार्फत 248 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन इतर सर्व आवश्यक उपायोजना व व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगसह मास्क चा वापर करावा आणि नियमांचे पालन करावे असे महापौर व आयुक्तांकडून आवाहन करण्यात येत आहे.

उक्त माहिती श्री गणेश भक्त व नागरिकांच्या माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप नंबर वर प्रसारित करण्यास नम्र विनंती.

आयुक्त,
मालेगाव महानगरपालिका मालेगाव.

About Shivshakti Times

Check Also

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात मालेगांव शहरातील हॉटेल मराठा दरबार येथे घेतलेल्या बैठकीचे …

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *