*”दार उघड उद्धवा दार उघड”
मालेगाव (प्रतिनिधी-युसूफ पठाण) –
मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा,बुद्धविहार, जैन मंदिर, सुरू करा या करीता आज मालेगांव तहसील कार्यालयासमोर *भारतीय जनता पार्टी, मालेगांव जिल्हा* यांच्याकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सावधानी बाळगण्याच्या दृष्टीने आवश्यक फलक मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा,बुद्धविहार, जैन मंदिर, इत्यादि पार्थनास्थळांसमोर लावण्यात यावी व सोशल डिस्टनसिंग पाळत सुरू करण्यात यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
*यावेळी मालेगांव भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेशजी ( नाना) निकम जिल्हा कोषाध्यक्ष सुधीरजी जाधव, नगरसेवक संजयजी काळे, नगरसेवक विजयजी देवरे, मध्य शहर अध्यक्ष सलीमजी पिंजारी, जेष्ठ पदाधिकारी यु आर अण्णा पाटील, सुरेशजी भाऊ गवळी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनीलजी शेलार, हेमंतजी पूरकर, सतिशजी उपाध्याय, पप्पू भाऊ पाटील, योगेशजी पाथरे, इखलाकजी नागा, अनिलजी पाटील, रोशनजी गांगुर्डे, अनिलजी वाघ, नाना भाऊ मराठे, मयूर पाटील, श्यामजी गांगुर्डे, प्रल्हादजी वानखेडे, भूषणजी शिंदे, आदि उपस्थित होते.*