केंद्र सरकारने पब जी सह – 118 ॲप्स वर बंदी
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून बंदीचा निर्णय
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. गलवान खोर प्रमाणे पॅंगॉंग सरोवर परिसरातही चीनी सैनिकांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीन विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहेत केंद्र सरकारने 118 ॲप्स वर बंदी घातली आहे.
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पब्जी गेम चाही समावेश आहे. माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अंतर्गत पब जी मोबाईल गेम वर बंदी आणण्यात आली आहे. भारताच्या सायबर स्पेस ची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने जाहीर केले आहे पीटीआयने यासंबंधी ट्विटर’वर वृत्त दिले आहे
Govt bans 118 mobile apps, including PUBG: Official statement
— Press Trust of India (@PTI_News) September 2, 2020