Breaking News

एस.टी.तील बदल्यांचा घोळ…मंत्र्याच्या यादीतील नावे नसल्याने स्थगिती दिल्याची चर्चा

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मुंबई (प्रतिनिधी – युसूफ पठाण) : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळात 15 टक्के बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 379 चालक आणि 108 वाहकांच्या बदल्यांची यादी जाहीरही झाली. मात्र, या बदली यादीला खुद्द एस.टी.च्या व्यवस्थापकीय संचालकांनीच स्थगिती दिल्याची चर्चा आहे. या यादीत मंत्र्यांना अपेक्षित नावे नसल्याने बदल्यांना तात्काळ स्थगिती दिल्याची चर्चा एस.टी. मुख्यालयात सुरू आहे.
सरकारने 10 आगस्टपर्यंत 15 टक्के बदल्या पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. महामंडळात बदलीसाठी मात्र मुदतवाढ घेण्यात आली होती. तरीही एस.टी. महामंडळातील बदल्यांचा गोंधळ संपताना दिसत नाही. गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये सेवा ज्येष्ठता पाळण्यात आली नाही. तर कोकणातील कर्मचाऱ्यांची सुद्धा यामध्ये बदली करण्यात आली. यामध्ये काही काळापूर्वी औरंगाबाद येथून रायगड विभागात बदली केलेल्या दोन चालकांना पुन्हा अल्पावधीतच रायगड येथून अहमदनगर येथे बदली दिल्याने बदलीच्या यादीत घोळ असल्याचे बोलले जात आहे.
परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना अपेक्षित कर्मचाऱ्यांची नावे बदलीच्या यादीतून गहाळ असल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली. परिणामी यादी जाहीर होताच काही तासातच बदलीला स्थगिती दिल्याची चर्चा एस.टी.च्या मुख्यालयात रंगली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, एस.टी.चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, तथा एस.टी.च्या वाहतूक विभागाचे व्यवस्थापक राहूल तोरो यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
मंत्र्यांचा बदलीत हस्तक्षेप
एस.टी.च्या 15 टक्के बदली प्रक्रियेत यापूर्वी परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयातून एस.टी.च्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, मंत्र्यांनी सुचवलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमांमध्ये बसत नसल्याने एस.टी.च्या काही अधिकाऱ्यांनी हात वर केले होते. त्यामुळे या बदली प्रक्रियेला उशीर होत असून, या संपूर्ण बदली प्रक्रियेत परिवहन मंत्र्यांचा जास्त हस्तक्षेप असल्याने बदल्यांची प्रक्रियाच पार पडत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *