Breaking News

शिकार केलेल्या काळविटाचं मटण खाणं पडलं महागात; काय आहे नेमकं प्रकरण?

सोलापूर (प्रतिनिधी-युसूफ पठाण ) : सोलापुरात काळविटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मटण विकत घेणे दोघांना चांगलेच महागात पडलं आहे. आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वन अधिनियमानुसार शिकार करणे किंवा त्याचे मटण खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे शिकाऱ्याकडून मटण घेणाऱ्यांना वनविभागाने अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुतन्ना कोळी आणि विष्णू बनसोडे अशी आरोपींची नावं आहेत.

यापूर्वी शिकार केल्याप्रकरणी अनेक शिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. मात्र, मटण विकत घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची महाराष्ट्रातील वन विभागाची ही पहिलीच कारवाई असल्याचं बोललं जात आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी गावात तीन दिवसांपूर्वी आरोपी विजय भोसले या शिकाऱ्याला वनविभागाने काळविटाच्या मटणासह रंगेहाथ अटक केली होती. यावेळी आरोपीच्या घरात काळविटचं मांस, चारही पायाचे खूरं, कातड्याचे तुकडे, शिंगे, नायलॉन वायरचे फासे, कुऱ्हाड, सुरा, वागर, वजन काटा असं साहित्या जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी इरशाद शेख यांनी अतिशय शिताफीने आरोपीचे कॉल रेकॉर्ड चेक करुन त्याच्याकडून ज्या व्यक्तींनी काळविटाचं मटण नेले, त्यांचा तपास केला. या तपासात दोन आरोपींचे कॉल रेकॉर्डिंग अधिकाऱ्यांना मिळाले.

त्यानुसार मुतन्ना कोळी आणि विष्णू बनसोडे या आरोपींना अटक करण्यात आली. अटकेनंतर दोघांना मे.कोर्टात हजर केलं असता मे.न्यायलयानं त्यांना 3 सप्टेंबरपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर आणखी कोणी यामध्ये सामील आहे का ? याचा देखील तपास वनविभागाचे अधिकारी करत आहेत.

दरम्यान, सोलापुरातील नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला आलेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोलापूर, जिल्हा पोलीस दल आणि वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त कारवाईतून हे काळवीट शिकार प्रकरण उघडकीस आलं आहे. संगदरी येथे काळवीटची शिकार करून त्याचे मांस विक्री होत असल्याची माहिती नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला मिळाली
त्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून सदर घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिस अधिक्षकांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोबत पाठवले. तसेच वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकली असता काळविटाची शिकार झाल्याचे उघड झाले.

About Shivshakti Times

Check Also

पोलीस हवालदार इकबाल अ. रशिद शेख महाराष्ट्र राज्यात व्दितीय.

Best Practices in C.C.T.N.S. and I.C.J.S. प्रणालीतील वैयक्तिक उत्कृष्ट कामगीरी मध्ये पोह/1465 इकबाल अ. रशिद …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

करोनाचा कहर… इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह ; खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू…… शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.