आज प्रथम मनपा कर्मचाऱ्यांची चाचणी
मालेगाव (सहसंपादक-राजेश सोनावणे ) : मालेगाव महानगर पालिका आणि भारतीय जैन संघटना यांचे संयुक्त विद्यमाने मनपा चे वाडिया दवाखान्यात संपूर्ण मनपा कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची अँटीबॉडी ( antibody) टेस्ट करण्यासाठी महापौर ताहेरा रशीद शेख यांच्या हस्ते आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्रथम माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक श्री रशीद शेख यांचे नमुना घेऊन तपासणी करण्यात आली , तदनंतर उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस, सहा.आयुक्त तुषार आहेर, सहा.आयुक्त वैभव लोंढे,आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉक्टर गोविंद चौधरी, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय काथेपुरी, स्विय सहाय्यक सचिन महाले, डॉक्टर अलका भावसार, योगिता कदम, जयश्री देशमुख, गजानन बन्नापुरे, राहुल ठाकूर इत्यादी कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला टेस्ट करून घेतली त्यावेळी मालेगाव महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह , नगरसेवक आणि भारतीय जैन संघटनेचे दिनेश जैन, पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
मालेगाव महापालिका व भारतीय जैन संघटना यांचेकडून सुरुवात करण्यात आलेली सिरो सर्वेलन्स टेस्ट ची सुरुवात प्रथम महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आरोग्य व सफाई कर्मचारी, आशा अंगणवाडी सेविका त्याबरोबर संपूर्ण महापालिकेच्या जवळपास 1500 कर्मचाऱ्यांचे टेस्ट करण्याचे नियोजन असून तदनंतर दि. 7 /9 /2020 ते 17 /9 /2020 पर्यंत या कालावधीत कंटेनमेंट झोन मध्ये 2000 चाचणी, तर नॉन कंटेनमेंट झोन मध्ये 3500 चाचणी असे एकूण 7000 अँटीबॉडी ( antibody) चाचणी / टेस्ट करण्यात येणार आहे. यात शहरातील कंटेनमेंट झोन व नॉन कंटेनमेंट येथील नागरिकांमधील साधारणता एका घरातील एक स्त्री व एक पुरुष यांचे सॅम्पल घेतले जाणार आहेत. उक्त चाचण्या ह्या मालेगाव शहरातील एकूण 14 नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत विभागात व परिसरात घेतल्या जाणार असून चाचणीद्वारे शहरातील नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाले किंवा कसे व हर्ड इम्यूनिटी विकसित झाली किंवा कसे याबाबत माहिती मिळणार आहे. यास्तव महापौर ताहेरा रशीद शेख, उपायुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की नागरिकांनी जास्तीत जास्त रक्त चाचणी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातून करून घ्यावी.
( दत्तात्रेय पी.काथेपुरी )
जनसंपर्क अधिकारी
मालेगाव महानगरपालिका मालेगाव.