Breaking News

रोपवाटिका मध्ये उभा असलेला ट्रॅक्टर जाळून राख

शिवशक्ती टाइम्स न्यूज

सिल्लोड  (प्रतिनिधी-रफिक शाह )- रोपवाटिका मध्ये उभा असलेला ट्रॅक्टरला आग लावून जाळण्यात आले.या आगीत शेतपयोगी साहित्याचेही राखरांगोळी झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील शेतकरी संजय शेषराव काळे यांच्या ईदवाडीला लागून असलेला शेती आहे या गट क्रमांक ७०४ मधील रोपवाटिका तसेच उभ्या असलेला ट्रॅक्टरला अज्ञात व्यक्तीने गुरुवारी मध्यरात्री दहा वाजता आग लावली.या आगीत ट्रॅक्टरसह ,शेततळे ची पट्टी जळून राख झाली .यात संजय शेषराव काळे, यांचे सात लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जाळपोळीविषयी माहिती मिळतेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दरम्यान अजिंठा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रविकिरण भारती व दीपक भंगाळे करत आहे

About Shivshakti Times

Check Also

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात; ⭕ पाच जणांचा मृत्यू…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. वाहनांनी एकमेकांना …

आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच जुळवलं सूत, आता जामिनावर लग्नही करणार……

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण जयपूर : लाच घेतल्याचा आरोप आणि त्यासाठी शिक्षा झालेली …

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *