बुलडाणा जिल्ह्यात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कार्यवाही
बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेतील 3 पोलिस कर्मचारी यांना फक्त ५० रुपयाची लाच स्वीकारताना अटक करण्यात आले आहे.ही कार्यवाही अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलडाणा शहरात येऊन केली आहे .
एका मालवाहु गाडीत म्हैस घेऊन जाणाऱ्या वाहन चालका कडून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेतील 3 पोलिस कर्मचारी कचरे,भूते व वारडेकर यांना लाच स्विकारतांना आज ७ सप्टेंबर दुपारी सुमारास मलकापुर रोडवर चौधरी गॅस पंप जवळ ५०रुपये लाच घेतानाअटक केली आहे.