Breaking News

संजय राऊतांवर शिवसेनेचा ठाम विश्वास; पुन्हा मुख्य प्रवक्ते पदी वर्णी

राज्यसभा खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर शिवसेनेनं पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

(प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज )

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेनेनं पुन्हा एकदा ठाम विश्वास दाखवला आहे. संजय राऊत यांची पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं यापुढील काळातही राऊत हे विरोधकांवर बरसताना दिसणार आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात संजय राऊत हे मुख्य प्रवक्ते आहेत. त्याशिवाय, अन्य दहा प्रवक्त्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांचा अन्य प्रवक्त्यांमध्ये समावेश आहे.

About Shivshakti Times

Check Also

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

वाईफ स्वॅपिंगसाठी नवरा करत होता जबरदस्ती, अखेर महिलेने उचलले हे पाऊल…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण अहमदाबादच्या एस.जी. हायवेवरील वाय.एम.सी.ए. क्लब जवळच्या पॉश वसाहतीत …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *