Breaking News

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांचे ७०/३० फार्मूला रद्द केल्याबद्दल आ.संतोष बांगर डॉ.राहुल पाटील बालाजी कल्याणकर यांनी भेट घेऊन मानले आभार.

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण

राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये ७०% प्रादेशिक कोटा व ३०% राज्यस्तर कोटा या धर्तीवर प्रवेश करण्यात येत होते . त्यासाठी उर्वरित महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ असे तीन विभाग कार्यरत करण्यात आले होते. ज्या प्रादेशिक विभागातुन उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्या संबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयांमध्ये ७०% जागा राखीव असतात.त्यामुळे मराठवाडा भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होतं. परंतु आता या निर्णयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना कसली अडचण असणार नाही त्यामुळे आज मराठवाड्यातील आमदार संतोषराव बांगर साहेब आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब बालाजीराव कल्याणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांनी हा फॉर्म्युला रद्द केल्याबद्दल त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

About Shivshakti Times

Check Also

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

बाजारपेठांना ‘लग्नसराई’चा साज…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण ) बदलापूर : तुळशी विवाहनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *