शिवशक्ती टाइम्स न्यूज (उपसंपादक – आनंद दाभाडे)
नमस्कार मी उत्तम कचवे🙏🙏
आमचे बंधू श्री.दिनेश कचवे (रा.क्लेकटर पट्टा,मालेगाव) हे मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह पेशन्ट होते. खूप गंभीर परीस्थिती झाली होती. वाचतात की नाही अस प्रश्न होता. खाजगी कोणीही डॉक्टर ऍडमिट करायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत कोरोना म्हायोद्धा मा.श्री.बंडू काका बच्छाव यांनी या प्रसंगी मोलाची मदत केली. प्रथम डॉ.श्री फझलूर रहेमान यांच्याकडे प्रथमोपचार केला. नंतर बंडू काकांनी प्रयत्न करून माझ्या भावाला सिव्हिल हॉस्पिटल, मालेगाव येथे ऍडमिट केले. ” म्हणतात ना डॉक्टर देवपेक्षा कमी नाही. त्याच पद्धतीने डॉ.श्री.हितेशजी महाले व डॉ.श्री.पुष्करजी इंगळे व त्यांच्या सम्पूर्ण स्टाफ ने खूप शिघेचे प्रयत्न करून सलग 23 दिवस रात्रं-दिवस प्रभावीपणे औषधोपचार करून माझ्या भावाला जीवदान दिले.अवघ्या 40-35 हजार रुपायांमध्ये माझ्या भावावर उपचार झाले.जर मी नाशिक किंवा मालेगाव ला खाजगी दवाखान्यात गेलो असतो तर मला नक्कीच 10 ते 12 लाख रुपये लागले असते. आज एवढ्या कमी पैशात माझा भाऊ व्यवस्थित झाला व मी कर्जबाजारी होण्यापासून देखील वाचलो. म्हणून मी बंडू काका बच्छाव व डॉ.इंगळे साहेब व डॉ.महाले साहेबांचे आभार मानतो
मी डॉ.श्री.हितेशजी महाले, डॉ.श्री पुष्करजी इंगळे व कोरोना म्हायोद्धा मा.श्री. बंडू काका बच्छाव यांच्या कार्याला सलाम करतो.मी व माझा सम्पूर्ण कचवे परिवार दोघे डॉक्टर व श्री.बंडू काका बच्छाव यांचा शतशः आभारी आहे. मी व माझा सम्पूर्ण परिवार त्यांचा सदैव ऋणी राहील. त्यानिमित्ताने आम्ही त्यांचा छोटेखानी सत्कार करून मी व माझा सम्पूर्ण कचवे परिवार त्यांचे आभार मानतो🙏🙏