चांदेश्वरी घाटात मोटारसायकलचा अपघात पती पत्नी गंभीर जखमी
जातेगांव (प्रतिनिधी युसूफ पठाण)– नांदगाव तालुक्यातील कासारी गावापासून उत्तरेस असलेल्या बोलठाण रस्त्यावरील चांदेश्वरी घाटात अवघड वळणावर मंगळवार दि.८ सप्टेंबर रोजी सकाळी१० वाजता स्कुटी गाडीचा वेग अनावर झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यास धडक बसल्याने कन्नड तालुक्यातील जेउर येथील एका पायाने अपंग असलेले साहेबराव चिंदाजि कांबळे (वय६५ वर्षे) आणि त्यांच्या पत्नी हे दोघे नांदगाव तालुक्यातील टाकळी येथे जात असतांना झाला.
हा अपघात येवढा गंभीर होता की, त्यांच्या स्कुटीची कठड्यास धडक बसताच वरील पती पत्नी सुमारे पन्नास फुट खोल दरीमध्ये फेकल्या गेले होते. त्यांचे दैव बलबत्तर असल्याने जिवीत हानी झाली नाही, परंतु आगोदरच एका पायाने अपंग असलेल्या साहेबराव कांबळे यांचा दुसरा पाय मोडला असून त्यांच्या पत्नीस कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना मदतकार्य करण्यासाठी आलेल्या तरुणांनी नातेवाईकांना फोन करून कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येवून बोलठाण येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले आहे.
वरील अपघाताची बातमी कासारी येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप इपर आणि ग्रामस्थांना एका मोटारसायकल स्वाराने सांगितल्या नंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या पती पत्नीस पन्नास फुट खोल दरीमध्ये उतरून अलगत उचलून आणले.
मदतकार्यासाठी धाऊन आलेल्या संदिप इपर आणि तरुणांनी याप्रसंगी सांगितले की या चांदेश्वरी घाटास ठिकठिकाणी अवघड वळणे असून मोठ्या प्रमाणात उतार असल्याने व घाटात अवघड ठिकाणी संरक्षण भिंत नसल्याने महिण्यातून दोन पेक्षा अधिक अपघात नेहमीच घडत असताच व वर्षभरात किमान आठ ते दहा प्रवाश्यांचा मृत्यू होतो. तरी या घाटाची दुरुस्ती करुन उतार कमी करावा आणि अवघड वळणावर उंच संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी केली आहे.
१) अपघातात जखमी महिलेस उचलून आनतांना तरुण
२) पन्नास फुट दरीत पडल्याने जखमी साहेबराव कांबळे
३) कठड्यास घडकलेली स्कुटी
४)५) जखमी कांबळे पती पत्नी