Breaking News

अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या रुग्णालयाच्या तक्रारीसाठी युवक राष्ट्रवादीचे हेल्पलाईन नंबर

शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे

नाशिक (दि.०९) – कोरोना बाधितांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असून रुग्णालयावर अंकुश ठेवण्यासाठी व रुग्णाच्या नातेवाईकांना बिलात दिलासा मिळावा याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांकरिता हेल्पलाईन सुरु केली आहे.

नाशिक शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. याचाच फायदा रुग्णालय घेत रुग्णालये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा बिल वसूल करत आहे. कोरोना आजारामुळे नागरिकांनी मोठी धास्ती घेतली असून भीतीपोटी तसेच आपल्या रुग्णाला कुठलाही त्रास होऊ नये त्याच्या जीवाची पर्वा करत नातेवाईक ऐपत नसतानाही कर्ज काढून किंवा मालमत्ता विकून रुग्णालयाचे अनपेक्षित वाढीव बिल भरत आहे. रुग्णालय वसूल करत असलेले वाढीव बिल केलेल्या उपचाराच्या तुलनेत जास्त आहे हे माहिती असतानाही याची तक्रार कुठे करायची याची प्राथमिक माहिती नसणाऱ्या नागरिकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील वाढीव बिलासंदर्भात तसेच इतर सोयीसुविधांबाबत तक्रारी असल्यास त्याचे निराकरण प्रशासनाच्या माध्यमातून करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विभागानुसार हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहे. ज्या विभागातील रूग्णालयाबाबत समस्या असेल तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून समस्याचे निराकरण करण्यात येणार आहे. 

रुग्णालयातील वाढीव बिलासदर्भातील तक्रारी खालील विभागाप्रमाणे पदाधिकाऱ्यांकडे करावे.

चेतन कासव प्रदेश पदाधिकारी- ९४०४४९३३३८,

शेखर शिंदे प्रदेश पदाधिकारी ९९७०४१३३३३

मध्य विधानसभा – जय कोतवाल -८८८८६२०९९९

पश्चिम विधानसभा – बाळा निगळ – ९९२२५७८७७७

नाशिकरोड विभाग – सत्यम पोतदार – ७७७५८३७८९९

पंचवटी विभाग – मितेश राठोड – ८१८०००१२२१

सिडको विभाग – मुकेश शेवाळे – ९८९००२७२९९

सातपूर विभाग – निलेश भंदुरे – ८८८८७८७७७२.

About Shivshakti Times

Check Also

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’

सारथी फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जपत नाशिक येथे महारक्तदान  शिबीर संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज नाशिक …

नाशिक व मालेगाव महापालिकेसह ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत आणि माहिती कक्ष कार्यान्वित;

आपापल्या कार्यक्षेत्राप्रमाणे रुग्णालयांनी मदत कक्षाकडून माहिती घेवून ऑक्सिजन प्राप्त करून घ्यावा-जिल्हाधिकारी सूरज मांढरे शिवशक्ती टाइम्स …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *