संतोष पवार :शासकीय अनास्थेने घेतला आणखी एका पत्रकाराचा बळी बघा, त्या अर्ध्या तासात काय घडले..
Shivshakti Times
September 14, 2020
मुंबई
216 Views
शिवशक्ती टाइम्स न्यूज – मुख्य संपादक – जयेश दाभाडे (सोनार)
प्रत्येकाने काळजी घ्या स्वतःचे संरक्षण करा
मुंबई – खरतर 108 या अम्बुलँस मुळे आणि त्यामधील अप्रक्षिक्षित स्टाफ मुळे पञकार व मराठी पञकर परीषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार यांना आपला जीव गमवावा लागला.या प्रकाराची कसुन चौकशी करून दोषी वर कारवाई करावी व पवार कुंटूंबास तात्काळ शासकीय मदत करावी आशी मागणी मराठी पञकार परीषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
सकाळी संतोष पवार यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अड्मिट केल्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल 54 % दाखवत होती त्यांना तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आले पण त्याचवेळी डॉक्टर यानी त्यांना या रुग्णालयात वेंटी लेटर उपलब्ध नसल्याने तुम्हाला पुढे न्यावे लागेल असे सांगितले पण आपल्या कर्जत मधे crdiac अम्बुलँस नसल्याने त्यांना 108 मधून पुढे D Y patil रुग्णालयात हलवणे असे ठरले. यां साठी माझी आमदार सुरेश भावू लाड, सुनील गोगटे, विकास मिरगनै दर्वेष पालकर रोशन दगडे त्यांचा मुलगा मल्हार पवार हे प्रयत्न करत होते.अखेर 108 मधून ऑक्सिजन लावून पवार साहेबाना पुढे नेण्यासाठी अम्बुलँस निघाली पण भीलवले च्या आसपास त्यांचा आधीचा लावलेला ऑक्सिजन सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर त्या अम्बुलँस मधील महिला डॉक्टर लां लावता आला नाही त्यामुळं तिने ड्राइवर लां तो सिलेंडर रुग्णांलां लावण्यास सांगितले पण तो सिलेंडर लावत असताना त्याचा प्रेशर जास्त झाल्याने तो सिलेंडर चा स्पोट झाला. त्यामुळे पुढे चौक प्राथमिक आरोग्य केंद्रापर्येंत संतोष पवार दहा ते पंधरा मिनट ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा आकस्मिक म्रूतू झाला.108 मधील सदोषयंत्रणा तसेचयामधील अप्रषिक्षित स्टाफ आणि कर्जत मधे वेंटी लेटर उपलब्ध नसणे यामुळे एका चांगल्या पत्रकाराचा जिव गेला या प्रकाराची चौकशी करून मृत्यू दोषी वर कारवाई करावी व पवार कुंटूंबा शासनाने तात्काळ शासकीय मदत द्यावी आशी मागणी मराठी पञकार परीषदेने केली आहे.
राज्यात बारावा पञकाराचा बळी कोरोना मुळे गेला
सर्व पञकार बांधवान नम्र अवाहण आहे आशा घटना वाढत आहेत आपल्या सर्वांना नम्र विंनती आपली काळजी घ्या समाजा साठी काम करा पणआपली आपल्या कुंटूंबाची काळजी घ्या असे अवाहण मराठी पञकार परीषदेच्या वतीने मुख्यविश्वस्त एस एम देशमूख विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष गजानन नाईक कार्याध्यक्ष शरद पाबळे उपाध्यक्ष यशवंत पवार सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी केले आहे
