Breaking News

मयताच्या टाळुवरचे लोनी खान्याचे काम खूप भयानक परीस्थिती आहे औरंगाबाद शहराची

बेवारस पेशंटचा अंत्यविधीसाठी माणुसकी समुहाला मोजावे लागले १७०५रू

प्रतिनिधी -युसूफ पठाण – दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राजेश मंगेशराव रामराजेकर दौलताबाद येथे काही ठिकाणी चाळीस वर्षापासून काम करत होता परंतु त्याची प्रकृती गंभीर झाल्याने सामाजिक कार्यकर्ते विलास ठिल्लारे यांनी माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांना फोन करून त्या आजारी पेशंट ची माहिती दिली असता त्याला या दिनांक.५-९-२०२० रोजी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घाटी मध्ये दाखल केले उपचारादरम्यान त्याचा ९-९-२०२०रोजी दुर्दैवाने मृत्यू झाला मृत्यूनंतर दौलताबाद पोलिस स्टेशनचे Asi मछिद्र पवार साहेबांनी दैनिकामध्ये मयताची वोळख पटन्याकरीता जाहिरात दिली असता सदरील मयताचे ओळख पटली नाही त्याचे कोणीच नातेवाईक नाही ही बाब समोर आली.३ दिवसानंतर पेशंटला अंत्यविधी साठि पोलीसांनी माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांना अंत्यविधीसाठी मयताची ब्याडि ताब्यात दिली त्याचा अंत्यविधीसाठी सुमित यांच्या सहकार्याने तयारी केली.अंत्यविधी हा बेगमपुरा स्मशानभूमी येथे करण्याचे ठरवण्यात आले परंतु बेवारस पेशंट साठि मनपा अंत्यविधीसाठी पूर्ण खर्च करते ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित मनपाने पंचशीला महिला बचत गट संस्थेला या अंत्यविधीचे काम दिले आहे. त्याच्याकडे सुमित पंडित यांनी फोनवर संपर्क केला असता त्यांनी सांगीतले कि ३००० रू खर्च लागेल तो मयत शहरातील नाही ग्रामीण मधला आहे. असे सांगीतल्यानंतर आता काय करायचे असा प्रश्न सुमित यांना पडला तीन हजार आता कुठून आणायचे आणि कसे द्यायचे आणि मनपाच्या पावतीवर अंत्यविधी शुल्क ५ देवुन मोफत होतो तर सुमित यांनी स्वताः अंत्यविधी करण्याचे ठरविले असता मनपामध्ये प्रमाणे पाच रुपये देऊन सदरील स्मशानभूमीची परवानगी देण्यात आली बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे जाऊन दफनविधी साठि परवानगी मिळाली परंतु स्मशानात गेल्यानंतर समाजसेवक सुमित पंडित यांना १७०५ रुपये मोजावे लागले.१००० रु स्मशानातील स्मशानजोगी ने गड्डे खोदायचे घेतले तर ७०० रु अँबुलंस चा खर्च द्यावा लागला यासाठी दृष्टी शोशल फाँडेश चे दिपक आर्य, Asi मछिद्र पवार दौलताबाद पोलीस स्टेशन,किरण रावल,विलास ठिल्लारे, सुमित पंडित आदिंनी मदतकार्य केले.

मयताच्या टाळुवरचे लोनी खान बंद करा
आम्ही कितीतरी गोरगरिबांना अहोरात्र मदत करतो आतापर्यंत खुप बेवारस पेशंट च्या अत्यसंस्कार आमच्या माणुसकी समुहाने केले.परंतु आज दिवसभर घडलेल्या या घटना क्रमाचा मी स्वतः एक साक्षीदार आहे .
समाजातील माणूसकी खरोखर कोठेतरी हरवत चालली आहे. परत परत एकच विचार अंतरंगात भिडतोय इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते सुरेश भटांच्या या कवितेतील या ओळींच्या ही सरस अर्थ कमी पडेल असा अनुभव मिळाला.टाळुवरच लोणी म्हणजे काय हे प्रत्यक्ष उदाहरण बेगमपुरा स्मशानभूमीत अनुभवास मीळाले.
——–समाजसेवक सुमित पंडित

About Shivshakti Times

Check Also

जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत – कृषी मंत्री दादाजी भुसे

• महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा तातडीने लाभ द्यावा • रानभाज्या विक्री व्यवस्था सातत्याने सुरु ठेवावी …

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे

प्रतिनिधी – यूसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मागील काही दिवसांत …

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा – पालकमंत्री सुभाष देसाई

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू करा शिवशक्ती टाइम्स न्यूज  –  प्रतिनिधी – …

Leave a Reply

Your email address will not be published.