Breaking News

आधार कार्ड केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा स्थानिकांना मोठा त्रास

नाशिक (दि.१५) – उपनगर येथील आधार कार्ड केंद्रात होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला असून स्थानिक रहिवाश्यांना या गर्दीचा मोठा त्रास होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनास वारंवार विनंती करूनही यावर उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्याचे टाळण्याचे आवाहन राज्य शासनाने केले असून त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करताना दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सरकारने गर्दी न करता आधारकार्ड केंद्र सुरु करण्यास परवानगी दिली. परंतु उपनगर मधील आधार केंद्रात प्रमाणाच्या बाहेर गर्दी बघावयास मिळत. आधार कार्ड केंद्र असलेल्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याठिकाणी दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनास आधार कार्ड केंद्र इतरत्र हलविण्यास विनंती करूनही त्यावर प्रशासनाने उपाययोजना केलेल्या नाही. आधार कार्ड केंदात होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला दिसून येत असून यातील काही व्यक्ती मास्कचा वापरही करताना नाही. तसेच आधार कार्ड केंद्रात सॅनिटायझरचा वापर होताना दिसत नाही. आधार कार्ड केंद्रात आलेल्या व्यक्तींची वाहने रस्त्यात उभी राहत असल्याने स्थानिकांना वहिवाटीस अडचण निर्माण होत असून शाब्दिक चकमक होत आहे. उपनगर परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून यात आधार कार्ड केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यात नाकारता येत नाही.
उपनगर परीसारातील नवीन चाळ मध्ये जिल्हा प्रशासनाच्या मालकीच्या जागेवर खाजगी आधार कार्ड केंद्र सुरु आहे. नवीन चाळ परिसरातील रस्ता छोटा असल्याने आधार केंद्रात होणाऱ्या गर्दीमुळे व आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे.

About Shivshakti Times

Check Also

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – …

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पोलिसांनी दाखल केला गुन्हा……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे …

महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष कैलास बच्छाव यांना मातृशोक

दुःखद निधन मालेगाव – कै. हि रू बाई राजाराम बच्छाव यांचे वय वर्षे 85 दिनांक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *