प्रतिनिधी – युसूफ पठाण (शिवशक्ती टाइम्स न्यूज ) – सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एसबीआयच्या शाखेत नवीन शाखा अधिकारी रुजु होऊन दहा दिवस उलटले परंतु हातात कोणतेच अधिकार नसल्याने पीक कर्ज मुद्रा लोन सह अनेक अडचणीचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे याबाबत पंचायत समिती सदस्य शेख सलीम यांनी बँकेत धडक देत व्यवस्थापक प्रवीण भागवत यांना जाब विचारला बुधवारपर्यंत पिक कर्ज वाटप करावे अन्यथा बँक समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला याबाबत भागवत म्हणाले की दहा दिवसापूर्वी रुजू झालो पण मुख्य ऑफिसवरून कोणतेही अधिकार मला मिळालेला नाहीत त्यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे
