Breaking News

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत छगन भुजबळ यांची पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा

 

मुंबई,नाशिक (प्रतिनिधी – युसूफ पठाण )  केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासंदर्भात पक्षप्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्र सरकारकडे ते स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असतांना केंद्र शासनाने अचानकपणे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असतांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी पक्षप्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून केंद्र सरकारकडे बाजू मांडली जाणार आहे.

त्यानुसार केंद्र सरकारबरोबर स्वतः शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्वतः मध्यस्ती करत असून तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जनतेच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरू करण्यात आलेल्या जनता दरबार उपक्रमांतर्गत

 अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. भेटीसाठी आलेल्या 

नागरिकांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *