Breaking News

कोरोना विरोधातील लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभागही फार गरजेचा आहे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रतिनिधी – रफिक शाह (शिवशक्ती टाइम्स न्यूज )

हवेली- कोरोना विरोधातील लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभागही फार गरजेचा आहे. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत घऱोघऱी जाऊऩ शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हातील प्रत्येक नागरीकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाला कुटुंबापासून, गल्लीपासून, गावापासून कायमस्वरुपी दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंमसेवी संस्था व नागरीकांनी स्वंयणस्फुर्तीने पुढे येऊन, कोरोना विरोधातील लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या योजनेअंतर्गत जिल्हातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील नागरीकांची तपासनी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेचा शुभारंभ कुंजीरवाडी येथे मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना डॉ. देशमुख यांनी वरील आवाहन केले. यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी संदीप कोईनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अशोक नांदापुरकर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेलीचे पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खऱात, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ, उपसरपंच नाना कुंजीर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे आदी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *