Breaking News

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाबाबत काँग्रेस जिल्हा भरणार छेडणार आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज

उपसंपादक – आनंद दाभाडे

नाशिक – मंगळवार, दि १५.सप्टे.२०२० रोजी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारने तडका-फडकी बाजार भावांवर अंकुश ठेवण्यासाठीचे कारण पुढे करत कांदा निर्यातबंदी जाहीर केल्यानं शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. केंद्र सरकारने सहा महिन्यात अशा प्रकारची कांदा निर्यात बंदी दोनदा लादल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तसेच गेल्या पाच सहा महिन्यात कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले असताना. त्यात ही निर्यातबंदी जाहीर करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची कंबरडेच मोडले असल्याची भावना शेतकरी वर्गात आहे म्हणून ह्या धोरणाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तात्काळ न उठवल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अनुसूचित जमातीचे अध्यक्ष रामचंद्र चौधरी, अफजल शेख, रेहमान शहा , धर्मराज जोपळे, मिलिंद उबाळे, रवींद्र घोडेस्वार, शिवाजीराव बर्डे, संजय निकम आदीसह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published.