पिंपरी-चिंचवड- प्रतिनिधी –
युसूफ पठाण याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी सांगवी पोलिस ठाणे हद्दीत औंध हॉस्पिटल कॅम्पसच्या आवारात आरोपी नामे आयाज शेख रा. शिवाजीनगर याने त्याच्या पत्नीचे सौरभ व्यंकट जाधव याच्याशी लग्नापूर्वी असलेले प्रेम संबंधाचा राग मनात धरून त्याचा साथीदार नामे सोन्या बाराथे रा. दापोडी याच्यासह मिळून मयत नामे सौरभ व्यंकट जाधव वय 28 रा. दापोडी याच्यावर धारदार कोयत्याने वार करून त्यात जीवे ठार मारले म्हणून सांगवी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 378 /2020 भा द वि कलम 302 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा प्रकार हा औंध हॉस्पिटलच्या आवारात दिवसाढवळ्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांनी गंभीर दखल घेऊन याबाबत गुन्हे शाखा युनिट यांना समांतर तपास करून ताबडतोब सर्व आरोपी अटक करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे गुन्हे शाखा युनिट 4 यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक अंबरीष देशमुख आणि आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह गुन्हा दाखल होतात समांतर तपास सुरू केला तेव्हा खून करतेवेळी आयाज शेख व सोन्या बाराथे व्यतिरिक्त आणखी चार आरोपी असल्याचे माहिती प्राप्त झाली त्यानुसार सदर आरोपींचा त्यांचे सर्व नातेवाईक मित्रांकडे तपास करत असताना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आयाज हा त्याच्या साथीदारांसह वडगाव मावळ परिसरात त्यांच्या एका मित्राकडे लपून बसलेला असून तो कुठेतरी लांब पळून जाण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह सदर परिसरात शोध घेऊन आरोपी लपून बसलेला चे ठिकाण शोधून काढले व सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे आयाज शेख हा त्याच्या गुन्ह्यातील साथीदार नामे नयन उर्फ दांड्या लोंढे यांचे सह पळून जाण्याच्या तयारीत असताना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले
सदर आरोपींना ताब्यात घेतल्यावर मुख्य आरोपी आयाज नूर मोहम्मद शेख वय 25 रा.गल्ली नंबर 8 पाटील इस्टेट शिवाजी नगर पुणे याने त्याच्या साथीदार नामे नयन विजय लोंढे वय 19 रा. राहणार लोंढे वस्ती शिवाजी पुतळ्याच्या जवळ दापोडी पुणे व सोन्या बाराते तसेच इतर तीन साथीदारांसह मिळून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे
सदर आरोपींना पुढील कारवाई कामी सांगवी पोलिस ठाणे यांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सांगली पोलीस ठाणे करत आहे तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त मा.श्री. कृष्ण प्रकाश साहेब ,अप्पर पोलीस आयुक्त मा.श्री. रामनाथ पोकळे ,पोलीस उपायुक्त (गुन्हे) मा.श्री.सुधीर हिरेमठ, सहा.पोलीस आयुक्त मा.श्री.राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीष देशमुख, पोलीस हवालदार प्रवीण दळे , नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार आदिनाथ मिसाळ, पोलीस नाईक संतोष अस्वले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, पोलीस शिपाई सावरसिद्धपांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे , धनाजी शिंदे , सुखदेव गावंडे , गोविंद चव्हाण, अतुल लोखंडे, नागेश माळी, राजेंद्र शेटे तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा यांनी केली आहे