Breaking News

नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली भेट

शिवशक्ती टाइम्स न्यूज

नाशिक : आज (दिनांक १५ )जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालय व्यवस्थापनाचा व कोविड -१ ९ रुग्णाच्या व्यवस्थापनाशी निगडीत सर्व बाबींची शहानिशा करुन आढावा घेतला . जिल्हा रुग्णालयाचे रुग्णांसाठीचे स्वयंपाकगृह , कोविड -१ ९ प्रयोगशाळा , रुग्णालयाची ऑक्सीजन प्रणाली , औषधालय , रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे कामकाजाचा त्यांनी या दरम्यान आढावा घेतला . रुग्णालयातील आहार विभागास प्रत्यक्ष भेट देवुन कोविड -१ ९ रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा तपासला व दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे संबंधीत कर्मचारी यांचे कामकाज बाबत जाणुन घेतले . कोविड -१ ९ रुग्णांना दिल्या जाणा ऱ्या आहाराचे दैनंदिन नियोजनाची त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली . सदर भेटी दरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले रुग्णांच्या नातेवाईक यांचेशी प्रत्यक्ष संवादसाधुन त्यांचे अडचणी जाणुन घेतल्या . जिल्हा रुग्णालयातील कोविड -१ ९ रुग्णालयासाठीचे आवश्यक प्रणाली ऑक्सीजन पुरवठा तसेच कोविड -१ ९ आजाराच्या रुग्णांसाठीच्या आर टी पी सी आर प्रयोगशाळेची पाहणी केली तसेच सदर ठिकाणीचे कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला . रुग्णालयातील विभाग प्रमुख , वैद्यकिय अधिकारी व इतर कर्मचारी यांचेशी देखील संवाद साधुन त्यांना कोविड -१ ९ रुग्णांना आरोग्य सेवा देताना प्रत्यक्ष येणा – या अडचणी बाबत विचारपुस केली व कामकाजाचा दर्जा देखील तपासला . कोविड -१ ९ रुग्णालयात आवश्यक़ मनुष्यबळ उपलब्धता व सदर कर्मचारी यांचे कामकाज , रुग्णांसाठी आवश्यक औषधी व साधान सामग्री यांची उपलब्धता , रुग्णालयात होणारा ऑक्सीजन पुरवठा , इतर आवश्यक साहित्य सामग्री , याचा होणारा पुरवठा याबाबत सविस्तर आढावा घेतला . जिल्हा रुग्णालयाच्या कोविड -१ ९ रुग्णालयातील रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करण्याचे त्यांनी सर्व कर्मचा – यांना आवाहन केले . कोविड -१ ९ रुग्णांना उच्च्तम व दर्जेदार सेवा देवुन मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वोतपरी उपाययोजना अमलात आणण्याच्या मानस त्यांनी बोलुन दाखविला . तसेच व्हिडीओ कॉलींगव्दारे कोविड -१ ९ रुग्णालयातील रुग्णांशीही त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला व रुग्णालयात मिळणा – या सोई – सुविधांविषयी व औषधोपचार विषयी रुग्णांकडुन शहानिशा केली . तसेच आवश्यक औषधोपचार व सुविधा रुग्णांना वेळेत पुरविण्या विषयी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .

About Shivshakti Times

Check Also

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

*शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही-पालकमंत्री छगन भुजबळ* शिवशक्ती …

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *