शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी – युसूफ पठाण
दिनेश गुप्ता जे स्वतः आणि त्यांची पत्नी कोव्हीड 19 या आजाराने संक्रमीत असून दोघे पती/पत्नी एमजीएम हॉस्पिटल, वाशी, नंवी मुंबई येथे उपचार घेत आहेत.
दिनेश गुप्ता यांनी काल रात्री 23/15 वाजता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवर विनंती केली होती की त्यांचा मुलगा चि.द्रीश, वय 7 वर्ष याचा दिनांक 15/9/2020 रोजी वाढ दिवस असून घरात फक्त त्यांची वयोवृद्ध आई आणि लहान मुलेच असल्याने पोलीसांनी त्यांच्या मुलाचा वाढ दिवस साजरा करावा.
म्हणून आज रोजी शीळ डायघर पोलीस स्टेशनचे वपोनी चंद्रकांत जाधव, सपोनि, ब्रिजेश शिंदे, विशाल चिटणीस, कृपाली बोरसे, पोउपनिरी सुजाता पाटील, पोना, प्रदीप कांबळे आणि इतर कर्मचारी यांनी दिनेश गुप्ता यांचे निर्मल नगरी, खर्डीपाडा येथे जाऊन चि.द्रीश याचा वाढ दिवस साजरा करून त्यास शुभेच्छा दिल्या.