शिवशक्ती टाइम्स न्यूज
मुख्य संपादक – जयेश दाभाडे (सोनार)
मालेगांव-नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे उपाध्यक्ष श्री. यशवंतजी पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आज दिनांक .१८ सप्टेंबर २०२० शुक्रवार रोजी दुपारी ०१ वाजता मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांचे नावाचे निवेदन मालेगांव प्रांत अधिकारी मा. विजयानंद शर्मा साहेब यांना मालेगांव तालुका मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात आले
*राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना यौध्दे म्हणून पन्नास लाख रूपयांची आर्थिक मदत त्यांचे कुटुंबीयांना तातडिने मिळावी या विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी मालेगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष चेतन महाजन,सरचिटणीस मनोहर शेवाळे,जिल्हा पदाधिकारी विनायक माळी, राजेश सूर्यवंशी,राहुल पवार, जयेश सोनार (दाभाड़े), बलराम चौधरी,कैलास माळी, मुकेश खैरनार, दीपक देवरे, हरीश मारू, समीर दोषी, यूसुफ पठान,रफीक शाह, रामदास पगारें, आदि पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते