Breaking News

कोरानाची भीती दूर करुन जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा-पालकमंत्री छगन भुजबळ

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पोलीस केअर सेंटरचे उद्घाटन

प्रतिनिधी – युसूफ पठाण

नाशिक –  कोरानाची भीती दूर करुन सेवा देणाऱ्या यंत्रणेने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे आवाहन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. पोलीस आयुक्तालय नाशिक येथे पोलीस कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस आयुक्तालय नाशिक येथे ‘पोलीस केअर सेंटर’ उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण संदिप घुगे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोना महामारीचा समना करतांना आर्थिक व्यवहास सुरु ठेवण्यासाठी लॉकडाऊनध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या कालवधीत रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी शासनस्तरावर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. या संकटाचा समाना करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे. कोरोना कालावधीतील पोलीसांचे आणि डॉक्टरांचे कोविड योध्दा म्हणून केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहीमेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीने आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारीने काळजी घेतली तर सर्वांना या आजारापासून दूर ठेवण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

या आजारावर उपचार करण्यासाठी आज जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु केले असून, या सर्व ठिकाणी योग्य ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणून कोरोना आजार झलेल्या रुग्णांनी घाबरुन न कोणत्याही कोविड सेंटर मध्ये भरती होवून उपचार घेणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्वांनी कोरोना रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी योगा, नैसर्गिक उपचार पद्धती व मानसिक आरोग्यवर भर दिला पाहिजे. सामाजिक बांधिकीच्या जाणीवेतून आपण सर्वांना या संकटाशी सामना करायचा असुन, ही लढाई जिंकायची असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.