Breaking News

नाशिक मध्ये जमावबंदी लागू करण्याबाबत पालकमंत्र्यांना युवक राष्ट्रवादीचे पत्र

शिवशक्ती टाइम्स न्यूज

नाशिक  (दि.२१) – नाशिक महापालिकेच्या कुचकामी धोरणामुळे कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता नाशिक शहरातील मधील हॉटस्पॉट क्षेत्रात जमावबंदी लागू करण्याबाबतचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ व पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना पाठविले आहे.

          वैश्विक महामारी कोविड-१९ चा प्रादुर्भाव नाशिक शहरात वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेकरिता तसेच आवश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहे. याकडे दुर्लक्ष करून नागरिक विनाकारण रस्त्यावर विनामास्क फिरताना दिसत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास नाशिक महानगरपालिका अपयशी ठरली असून सर्वस्तरावरून विरोध होत असताना रॅपीड टेस्टची मोहीम घेण्यात आली. नाशिक शहरात महानगरपालिकेचे कोविड केअर सेंटर असून अद्यापपर्यंत कोविड हॉस्पिटल सुरु करता आलेले नाही. प्रत्येक दिवशी महापालिकेच्या रुग्णालयात नवनवीन घटना घडत असून रुग्णालयाचा निकृष्ट दर्जा या घटनेतून समोर येत आहे. नाशिक महापालिकेच्या कुचकामी धोरणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असून कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. नाशिकमध्ये कोरोना मुक्त  रुग्णांची संख्या व कोरोना बाधितांची संख्या सारखी असल्याने नाशिक मधील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही.  याकरिता नाशिक मधील हॉटस्पॉटच्या भागात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात असे पत्रात लिहिले आहे.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.