Breaking News

धुळे महानगरपालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची होणार चौकशी

*धुळे महानगरपालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची होणार चौकशी प्रधान सचिव नगरविकास विभाग यांचे AIMIM आमदार फारूक शाह यांना आश्वासन* …

प्रतिनिधी – रफिक शाह

(धुळे) दि. २२-०९-२०२० रोजी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी आज मुंबई येथे प्रधान सचिव सो. नगरविकास विभाग मंत्रालय यांची भेट घेतली असता आमदार फारूक शाह यांनी धुळे शहरातील विविध विषयांबाबत तक्रार प्रधान सचिव सो. नगरविकास यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती. धुळे महानगरपालिकेच्या शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. या शाळांची अवस्था अतिशय खराब असुन या शाळांची पडझड देखील झालेली आहे. धुळे शहरातील महानगरपालिकेच्या दवाखान्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी झाली असुन गोर-गरिबांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. मी या शाळांच्या दुरुस्ती बाबत वारंवार लेखी पत्र व्यवहार करून देखील त्याबाबत कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच धुळे शहराजवळील असलेल्या जलसाठ्यात मुबलक प्रमाणावर जलसाठा असतांना देखील धुळेकर जनतेला ८ ते १० दिवस पाणी मिळत नाही. शहरातील प्रमुख चौकातील सर्व सिग्नल यंत्रणा बंद आहे. लॉकडाऊन च्या काळात ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ शिवाय अर्थातच कोरोना आजारावर होणारा खर्च वगळता इतर कोणत्याही कामांसाठी पैसा खर्च करू नये असे आदेश असतांना सुद्धा धुळे मनपाचे काही भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट पदाधिकारी यांनी संगनमत करून माहे दि. १ मे २०२० ते दि. २८ जुलै २०२० पर्यंत मोठ्या प्रमाणावर ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली आहे. तसेच शहरातील कंटेंनमेंट झोनसाठी लागणारे सामग्री पत्रे, बांबु इत्यादींच्या नावाखाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांची अफरातफरी करण्यात आली आहे. तसेच शहरात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरलेले असुन कचरा संकलन वेळेवर होत नाही. करारनाम्यात नमुद असलेले वाहन व कर्मचारी निम्मे लावुन संपुर्ण कर्मचारी व संपुर्ण वाहने कामाला असे भासवुन संपुर्ण रकमेचे बिल काढले जात आहे. धुळे महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांचे व कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे संगनमत असुन मनपाच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर लुट सुरु आहे.
ही बाब अतिशय गंभीर असुन धुळे महानगरपालिकेच्या कारभारी चौकशी करण्याकामी एका विशिष्ट समितीची नेमणुक करण्यात येऊन शासनाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून शासनाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडुन वसुल करण्यात येईल असे आश्वासन प्रधान सचिव सो. नगरविकास विभाग यांनी *AIMIM आमदार फारूक शाह* यांना दिले.

About Shivshakti Times

Leave a Reply

Your email address will not be published.