Breaking News

मंत्री संदीपानं भुमरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शुभहस्ते उंडनगाव, शिवना, अजिंठा गटातील विविध विकास कामांचा शुभारंभ

राज्य शासनाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे – रोहोयो मंत्री संदीपानं भुमरे

तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जम्बो प्रोजेक्ट राबविणे गरजेचे- ना.अब्दुल सत्तार

राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड मतदार संघातील उंडणगाव ,शिवना ,अजिंठा या जि. प. सर्कलमधील विविध गावांत जवळपास ११ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा तसेच शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियानाचा शुभारंभ मंत्री ना. संदीपानं भुमरे व महसूल ,ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या शुभहस्ते तालुक्यातील अंभई , खुल्लोड, उंडणगाव, धोत्रा, शिवना,अजिंठा, मुखपाठ येथे संपन्न झाला. या उदघाटन प्रसंगी ना. संदीपान भुमरे बोलत होते.पुढे बोलताना ना. भुमरे म्हणाले की पूर्वी एम जी नरेगा मध्ये एका गावात केवळ पाच विहिरी शेतकऱ्यांना घेता येत होत्या . आता हे निकष बदलण्यात आले असून लोकसंख्येच्या आधारावर सरकार २० पेक्षा जास्त विहिरी देत आहेत. त्यामुळे राज्यातील सिंचन क्षेत्र वाढत असून फळबाग वाढीला प्रोत्साहन मिळत आहे. वृक्षलागवडीचे रोपांमधील अंतर पूर्वी अधिकारी ठरत होते . आता याचा अधिकार शेतक-यांना देण्यात आला आहे . आता विकेल ते पिकेल या माध्यमातून भाजीपाला, फळबाग नर्सरी देण्याचे काम सरकार करणार आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकास साधण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करीत असून पाणंद रस्ते साठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करा.सिल्लोड मतदार संघात रोजगार हमी व फलोत्पादन विभागाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ना. संदीपानं भुमरे यांनी यावेळी दिली.
सिल्लोड मतदार संघात पडलेल्या पावसाचे अर्धे पाणी गोदावरी खोऱ्यात तर अर्धे पाणी तापी खोऱ्यात वाहून जाते.यामुळे डोंगररांगेतील गावे व सोयगाव तालुक्याला नेहमी पाण्याचा प्रश्न उद्भवतो . यासाठी रोजगार हमीची जोड देत अजिंठा डोंगर रांगेतील पाणी अडविण्यासाठी जम्बो प्रोजेक्ट राबविण्यासाठी ना. अब्दुल सत्तार यांनी मंत्री संदीपानं भुमरे यांच्यासमोर संकल्पना मांडली . यावर येत्या आठ दिवसात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक लावून हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे मंत्री संदीपान भुमरे यावेळी म्हणाले .
पुढे बोलताना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील लोक गावात आले. त्यामुळे या लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी ना. संदीपान भुमरे यांनी केंद्र सरकार कडे विषय मांडल्यामुळे देशात ३० ते ४० हजार कोटीची तरतूद करण्यात आली. मंत्री संदीपान भुमरे यांनी जनहिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *