प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज
निफाङ – केंद्रशासनाने मंजूर केलेले तीन कृषी विधेयक हे शेतक-यांच्या हिताच्या विरोधात असून शेतक-यांना पूर्णपणे उध्धवस्त करणारे आहे.तसेच शासनाच्या विविध विभागाच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदावरुन काढून त्यांच्या नोकरीला कंत्राटी पध्दतीचे स्वरुप आल्याने त्यांच्या नोकरीची शास्वती राहीली नाही. भविष्यात त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होणार आहे. याचे दुरगामी परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला सहन करावे लागणार आहे. कोरोनाच्या काळात सरकारने खंबीरपणे नागरीकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना रोज विविध विधेयकांच्या नावाखाली शासन जनतेची दिशाभूल करीत आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभुमीवर निफाङ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने युवकचे काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, राजेंद्र मोगल .दिगंबर नाना गीते,सुनील निकाळे,विनायक शिंदे .शामराव शिंदे,सुरेश कापसे,सचिन होळकर,राजेंद्र बागङे,ज्ञानेश्वर मोगल,सुहास सुरळिकर,नरेंद्र गीते,राहुल नागरे,राजेश लोखंडे, निखिल निकाळे, सुरज साळवे,राहुल पवार,,सतीश भालेराव,ऋषिकेश साळवे,गणेश पवार,अजिंक्य बागुल, आकाश जगताप,रोशन सोनवणे आदी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निफाड उपबाजार आवारापासुन निषेध मोर्चा काढून तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार कल्पना निकुंभ मॅडम यांना निवेदन देण्यात आले.