Breaking News

डोंगरी पोलीस ठाण्याची कारवाई – हनीफ लंगडा यास अटक

प्रतिनिधी – युसूफ पठाण

शिवशक्ती टाइम्स न्यूज

डोंगरी – दिनांक 26/9/2020 रोजी 11.00 वाजता सुमारास पोलीस उप निरीक्षक दिनकर, पोलीस उप निरीक्षक खुळे, पोलीस निरीक्षक कुंभार , पोलीस शिपाई अजित कदम, मुल्ला, कुमावत व पोलिस पथक चावल गल्ली परिसरात गस्त करीत असताना एक इसम पोलीस पथकास पाहून तेथून संशयित रित्या हालचाल करून आपली ओळख लपवून पळून जाण्याचा पर्यंत करू लागला असता त्यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले सदर इसमाची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 22 ग्रॅम एम.डी. किंमत 66000/- रुपयाचा मिळून आला. सदर इसमाचे नाव मोहम्मद हनीफ बिलाल मर्चंट उर्फ हनीफ लंगडा असे असून तो अभिलेखा वरील आरोपी आहे. त्यावर खालील नमूद गुन्हे दाखल आहे.

1. गु. र. क्र. 348/2008 कलम 8(c) 20,29 /ANC
2. गु. र. क्र. 201/07 कलम 8(c) 27 /ANC
3. गु. र. क्र.29/09 कलम 8(c) 27/ANC
4. गु. र. क्र. 212/13 कलम 8(c) 20/ANC
5. गु. र. क्र. 214/13 कलम 8(c) 20 /ANC
6. गु. र. क्र. 311/14 कलम 8(c) 27 डोंगरी
7. गु. र. क्र. 72/19 कलम 8(c) 27 /डोंगरी

सदर आरोपी इसमाविरोधात एन. डी.पी.एस कायदा अन्वये वि.स्था.गु.र.क्र. 14/2020 कलम 8(क) सह 22(ब) ndps act. अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संदीप भागडीकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
डोंगरी पोलीस ठाणे मुंबई

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.