Breaking News

शरद पवार आणि विश्वास नांगरे-पाटील यांच्यात भेट, ⭕कारण गुलदस्त्यात…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी – युसूफ पठाण 

मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांमध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्यात काही काळ चर्चा झाली. मात्र, या भेटीचं कारण आणि तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विश्वास नांगरे-पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सलग दुसऱ्या दिवशीच्या या ‘भेटसत्रा’मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण या दोन्ही बैठकांमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

नांगरे पाटील यांची मुंबईत बदली –

उद्धव ठाकरे सरकारने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी बदली केली होती. विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईत पदभार स्वीकारला आहे.

About Shivshakti Times

Check Also

वाईफ स्वॅपिंगसाठी नवरा करत होता जबरदस्ती, अखेर महिलेने उचलले हे पाऊल…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण अहमदाबादच्या एस.जी. हायवेवरील वाय.एम.सी.ए. क्लब जवळच्या पॉश वसाहतीत …

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत……

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत…… मुंबई : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी …

बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात……

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात…… मुंबई : …

Leave a Reply

Your email address will not be published.