शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे
आज मालेगांव महानगरपालिका, प्रभाग क्र. 1 ची सभापती पदाची निवडणुक पिठासन अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
यात, शिवसेना पक्षाच्या वतीने श्री. राजाराम बाबुराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यानिमित्त, मा. ना. दादाजी भुसे साहेब, मंत्री कृषि व माजी सैनिक कल्याण यांनी श्री. जाधव यांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधून शुभेच्छा दिल्यात.
तसेच, यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमोदजी शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाणे, महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी, युवासेना जिल्हाप्रमुख विनोद वाघ, अजिंक्य भुसे, उपमहापौर निलेश आहेर, नगरसेवक सखाराम घोडके, जयप्रकाश बच्छाव, नारायण शिंदे, भिमा भडांगे, पुष्पा गंगावणे, कविता बच्छाव, जिजाबाई पवार, प्रमिभा पवार, ज्योती भोसले, आशाबाई आहिरे, जिजाबाई बच्छाव, कल्पना वाघ, राजेश अलिझाड, व इतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही शुभेच्छा दिल्यात.