प्रतिनिधी – युसूफ पठाण
शिवशक्ती टाइम्स न्यूज
निफाडचे मा.आमदार अनिल(अण्णा) कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज निफाड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या खेरवाडी गणाच्या सदस्या सौ.रत्नाताई शंकर संगमनेरे यांची तर उपसभापतीपदी भाजपचे विंचूर गणाचे सदस्य संजय शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मा.आमदार अनिल कदम यांनी भाजपच्या संजय शेवाळे यांची उपसभापतीवर्णी लावून दिलेला शब्द पाळला त्यामुळे शेवाळे यांनी अनिल (अण्णा) कदम यांचे विशेष आभार मानले. तत्पूर्वी मावळत्या सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा सुरासे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड यांच्या हस्ते नूतन सभापती-उपसभापती दालनाचे उदघाटन करण्यात आले.! नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, करंजगावचे मा.सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.! यावेळी जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जि.प सदस्य दीपक शिरसाठ, नगरसेवक अनिल पाटील कुंदे, भाजपाचे प्रकाशशेठ दायमा, शंकरराव वाघ यांच्यासह शिवसेना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खंडू बोडके-पाटील यांनी केले.! नवनिर्वाचित उपसभापती संजय शेवाळे यांनी आभार मानले.!