Breaking News

ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम ……

प्रतिनिधी – युसूफ पठाण  शिवशक्ती टाइम्स न्यूज

नाशिक : करोनाचे संकट वाढत असताना पेठ तालुक्यातील वाडी, वस्तीवर शाळा बंद आहेत. या मुलांनाभ्रमणध्वनीअभावी ऑनलाइन शिक्षणही दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत ३० गावांमध्ये घराघरात अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी सोशल नेटवर्किंग फोरमने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. हे साहित्य फोरमच्या ग्रामसमन्वयकांनी (एस.एन.एफ.) संकट काळात सामाजिक जबाबदारी निभावत जवळपास तीन हजार बालकांच्या घरापर्यंत पोहचवले. फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे यांच्या पुढाकाराने गाव तेथे एस.एन.एफ. या अभियानात गावागावात सामाजिक कार्याची उर्मी असलेल्या युवकांना एकत्र करून भक्कम फळी तयार करण्यात आली. याच ग्राम समन्वयकांचे आयोजन, नियोजन आणि संयोजनातून शैक्षणिक साहित्य वाटपाची मोहीम  यशस्वी करण्यात आली. सोशल नेटवर्किंग फोरमच्या व्यासपीठावरून युवा  ग्राम समन्वयकांनी आपली जबाबदारी उत्तम रितीने बजावत आपल्याच बंधू-भगिनींना ज्ञानार्जनासाठी साहित्य पोहचविले. फोरमचे प्रमुख गायकवाड यांनी एस.एन.एफ. ग्रामसमन्वयक संकल्पना विषद केली. आदिवासी भागात आरोग्य, शिक्षण आणि पाण्याच्या अनेक समस्या असतात. या समस्या वेळेवर फोरमपर्यंत पोहोचल्या तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येतात. यासाठी गाव तिथे ग्रामसमन्वयक ही संकल्पना आम्ही राबवली आहे. आनंदाची बाब म्हणजे या समन्वयांकडून अनेक समस्या आमच्यापर्यंत पोहोचू लागल्या आहेत. त्यापैकी काही सोडवण्यातही फोरम यशस्वी ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्यातील अनेक तरूणांनी या सामाजिक कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे.

About Shivshakti Times

Check Also

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

*शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही-पालकमंत्री छगन भुजबळ* शिवशक्ती …

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *