Breaking News

बलात्कार दोषींना फाशी देण्याची राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची मागणी

 उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी

शिवशक्ती टाइम्स न्यूज

नाशिक (दि.०१) – उत्तर प्रदेशात महिला व युवतींवर अत्याचार सुरूच असून हाथरस भागात दलित तरुणीवर बलात्कार करत अमानुषपणे अत्याचार करण्यात आले हे प्रकरण ताजे असतानाच बलरामपूरमध्येही तरुणीवर बलात्काराची घटना घडली. या नराधमांना तातडीने फाशी देण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक काळे यांना दिले.

उत्तर प्रदेश हे गुन्हेगारीचे राज्य म्हणून प्रचलित असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात (दि १४ सप्टेंबर) १९ वर्षीय दलित तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, अमानुष अत्याचार केले. पीडिता बलात्काराची तक्रार करू नये याकरिता तिची जीभदेखील कापून टाकली. तसेच बलरामपूर मध्येही असाच घृणास्पद प्रकार घडला आहे. पीडीतेला अमानुष अत्याचार सहन न झाल्याने (दि.२९) उपचार दरम्यान तीचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणताना गावकऱ्यांनी विरोध प्रदर्शन केल्याने, उत्तर प्रदेश पोलिसांनी मध्यरात्री पीडीतेवर अंत्यसंस्कार केले. आपल्या मुलीचा मृतदेह घरी नेऊन, विधीवत तिचे अंत्यसंस्कार करता यावे, म्हणून पीडितेचे कुटुंब पोलिसांकडे विनवणी केली. परंतु यास नकार देत, तब्बल २०० पोलिसांच्या ताफ्यासह पीडितेचा मृतदेह थेट स्मशानभूमीत नेण्यात येऊन पोलिसांनी जबरदस्ती मुलीचे अंत्यसंस्कार उरकले.

दलित युवतीच्या चितेची आग थंडी होत नाही तोच उत्तर प्रदेश राज्यातील बलरामपूर मधील गैसरी गावातील २२ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करून हत्या झाल्याची घटना घडली. यानंतर बुलंदशहर जिल्ह्यातील ककोड क्षेत्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. उत्तर प्रदेश राज्यात आजमगढ जिल्ह्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेश राज्य महिला, युवती व विद्यार्थ्यांनीसाठी सुरक्षित राज्य नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.

या सर्व प्रकरणाचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येऊन  उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी हि निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी दिलीप दोंदे, मोतीराम पिंगळे, रविंद्र जाधव, पंडित पाडमुख, लक्ष्मण गायकवाड, मदन मोरे, सचिन जाधव, पंडित खाडे, भाऊसाहेब मते, सजन नाना गांगुर्डे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *