Breaking News

हाथरसमध्ये नक्की काय घडलं ते सांगा ’; वरिष्ठ अधिकाऱ्यांना मे.अलाहाबाद उच्च न्यायालयाची नोटीस….

शिवशक्ती टाइम्स न्यूज

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन आता मे.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सरकारच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. न्या. राजन रॉय आणि जसप्रीत सिंग यांनी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव, उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना १२ ऑक्टोबर रोजी मे.न्यायालयात हजर राहून या प्रकरणासंदर्भातील माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. १४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात मे.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्वतःहून याचिका
(सुमोटो)  दाखल करुन घेतली. यावेळी मे.न्यायालयाने हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनाही हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हाथरसमध्ये नक्की काय घडलं यासंदर्भात पोलिसांकडे असणारे सर्व पुरावे आणि कागदपत्र घेऊन अधिकाऱ्यांनी मे. न्यायालयासमोर हजर रहावे आणि यासंदर्भातील माहिती पुराव्यानिशी मे.न्यायालयाला द्यावी असंही खंडपीठाने नोटीसमध्ये म्हटलं आहे. पीडित तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. तिचे पार्थिव घरी घेऊन जाण्याची कुटुंबीयांची मागणी धुडकावून पोलिसांनी मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच मे.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या कारवाईमुळे आता पोलिसांना मे. न्यायालयासमोर हे सर्व प्रकरण सविस्तरपणे मांडावे लागणार आहे.

About Shivshakti Times

Check Also

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद

*नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद !*  शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी …

स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…;

आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक…. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *