उत्तर प्रदेश हथरस मधील बलात्कारी नराधमांना सार्वजनिक फाशी द्या:-RPI आठवले व पब्लिक पोलीस NGO ची मा सहायक पोलीस आयुक्तांकडे मागणी..!*
शिवशक्ती टाइम्स न्यूज
*नाशिक प्रतिनिधी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व पब्लिक पोलीस NGO यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी सहायक पोलिस आयुक्त श्री अशोक नखाते व उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनीलजी रोहकले साहेब यांची भेट घेऊन सदर निवेदन सादर केले..निवेदनात हाथरस येथील दलित समाजातील युवती मनीषा वाल्मिकी हिच्यावर गावातील गावगुंडानी सामूहिक बलात्कार करून तिची अंत्यत हृदयद्रावक पध्दतीने निर्घृण हत्या केली त्याचबरोबर स्थानिक पोलिसांनी पीडितेच्या घरच्यांची परवानगी न घेता परस्पर अंत्यसंस्कार केले ह्या सर्व गोष्टींची CBI मार्फत चौकशी करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालऊन नराधमांना दिवसाढवळ्या सर्वांसमोर त्यांना फाशी द्यावी ही मागणी केली..!*