शिवशक्ती टाइम्स न्यूज
मालेगाव = कॉलेज स्टॉप, मालेगाव येथे खाजगी क्लासेसच्या शिक्षकांच्या मीटिंग मध्ये सर्व शिक्षकांनी एकत्र येत आपली संघटना स्थापन केली व आपली कार्यकारिणी जाहीर केली.कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष- श्री.अंकुश मयाचार्य
उपाध्यक्ष- श्री.प्रशांत खैरनार सर, श्री.योगेश देवरे सर (करंजगव्हाण)
सचिव-श्री.योगेश पवार सर
सहसचिव- श्री.संजय हिरे सर, श्री.राजेंद्र सावळे सर
कोषाध्यक्ष-श्री.अमोल अहिरे सर
महिला आघाडी अध्यक्ष-सौ.अनघा जोशी मॅडम
समन्वयक पदी सर्व जेष्ठ शिक्षक असतील ज्यांच्या देखरेखीखाली असोसिएशन चे सर्व निर्णय घेतले जातील
आज झालेल्या मीटिंगमध्ये सर्व जेष्ठ शिक्षक प्रा.डी. एल.अहिरे,प्रा.निलेश कचवे,प्रा.सोनवणे,प्रा.प्रमोद देवरे,प्रा.विठ्ठल यादव,प्रा.अनघा जोशी आणि सर्व जेष्ठ शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते M.C.C.A ची ( Malegaon Coaching Classes Association)
कार्यकारणी जाहीर झाली.
आज निवड झालेल्या कार्यकारिणीचे समाजातील विविध स्तरांतर्फे अभिनंदन केले जात आहे.नवीन कार्यकारिणीने मालेगाव तालुक्यासाठी शिक्षण क्षेत्रात विधायक काम करण्याचा निश्चय केला.