शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
प्रतिनिधी – युसूफ पठाण
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही आठवडेच शिल्लक राहिले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची लगबग असून, शिवसेनेनंही बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती यापूर्वी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. दरम्यान, आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह २० जणांच्या नावांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.