कार्यकारी संपादक – राजेश (पप्पू) सोनवणे
शिवशक्ती टाइम्स न्यूज
मालेगाव – स्मशान मारुती मळ्यातील ज्येष्ठ नागरिक कै. मधुकर गंगाधर जाधव हे दि. २ ऑक्टोबर रोजी आपणा सर्वाना सोडून गेले. त्यांचा आज रोजी गंध मुक्तीचा कार्यक्रम करण्यात आला. मधु बाप्पू हे मालेगाव मध्ये मधु मिस्त्री या नावाने परिचित होते अत्यंत मनमिळाऊ स्वभाव सार्वजनिक गणेशोत्सव असो किंवा नवरात्री असो बापू त्यात भाग घेत असे आर्थिक व इतर मदतीसाठी ते नेहमी मी तत्पर असायचे. गणेशोत्सव , सत्यनारायणाची पूजा, नवरात्री उत्सव आला कि लागणारे पूजा सामग्री किंवा आर्थिक मदत ह्या सर्व वस्तूंची बापू स्वतः मंडळाला स्वखर्चातून देत असत. गणेश मिरवणुकीत मधु बापूंचा उत्सव बघण्यासारखा असायचा. बँड वर झेंडा हातात घेऊन ढोलच्या ठेक्यावर बापूंचा नाच पाहिला आम्ही सर्वच उपस्थित राहायचं. लहान कार्यकर्ते असो किंवा ज्येष्ठ नागरिक सगळ्यांमध्ये बाप्पू हे आवडते असे व्यक्तिमत्त्व होते.
नव्वदच्या दशकात ज्यावेळी ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही कुठेही नसायचा. त्यावेळेस रामानंद सागर कृत रामायण मालिका लागायची ती बघण्याकरता बापूंनी त्यावेळी क्राऊन कंपनीचा कलर टीव्ही घेतला. म्हणून आम्हा सर्वांना राम चरित्राचे दर्शन हे टीव्हीच्या माध्यमातून बापू ने घडवले. आम्ही लहान होतो तरी बापू सर्वांना घरात बसून मालिका बघण्यास सांगत, ते दिवस आठवले तरी डोळ्यात अश्रु येतात. द जंगल बुक, मोगली, शक्तिमान ची मालिका बापूंनी बालगोपाळांना दाखवली.
या सर्व आठवणीचा ठेवा ठेवून बापू अनंताच्या यात्रेला निघून गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही श्रीराम चरणी प्रार्थना बापूंच्या परिवारात त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी त्यांचे तीन मुलं तसं नातवंडे असा परिवार आहे. बापूचा एक मुलास त्यांनी देशसेवा करण्यास लष्करात भरती केले. जनता जनार्दन बापूचे कार्य नेहमी लक्षात ठेवेल.
परमेश्वर त्यांच्या परिवारास दुःखातुन लवकरच बाहेर काढेल. बापूंच्या आठवणी त्यांचे कार्य सदैव प्रेरणा देत राहणार यात शंका नाही. गंध मुक्तीच्या कार्यक्रमप्रसंगी वार्डातील सर्व जेष्ठ नागरिक तसेच नगरसेवक प्रतिनिधींसह सर्व उपस्थित होते.
शिवशक्ती टाइम्स न्यूज काढून मधु बाप्पू यांना कोटी कोटी प्रणाम व आदरांजली.